अमेरिकेची रिऍक्शन…हा इस्लामिक टेरर ऍटॅक; तुलसी गॅबार्ड यांची स्पष्ट भूमिका

जम्मू-कश्मिरात पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष्य करीत त्यांना ठार करण्यात आले. हा इस्लामिक दहशतवादी हल्ला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अमेरिका हिंदुस्थानला मदत करण्यास तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘एनआयए’च्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी ‘एक्स’वर मांडली आहे.

पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना शोधून त्यांना कल्पनेपलिकडची कठोर शिक्षा देऊ असा इशारा गुरुवारी दिला आहे. त्यानंतर आता ‘एनआयए’ प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी हिंदुस्थानला मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

रशियन दुतावासाची अ‍ॅडव्हायझरी; पाकिस्तानला येणे टाळा

पाकिस्तानमधील रशियाच्या दुतावासाने एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. ‘हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे रशियन नागरिकांनी पाकिस्तानात येणे टाळावे,’ असे अॅडव्हायझरीत म्हटले आहे.