दहशतवाद्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, लष्करप्रमुख आणि राज्यपालांनी बैठकीत घेतला सुरक्षेचा आढावा

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये पोहोचले. त्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि द्विवेदी यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू- कश्मीरमधील परिस्थितीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवाद्यांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे सिन्हा आढावा बैठकीत म्हणाले. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

सुरुवातीला कमांडर्सनी लष्करप्रमुख द्विवेदी यांना एलओसीवरील सुरक्षा आणि कश्मीरमधील परिस्थिती याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करतानाच दहशतवादाचे पूर्ण जाळे आणि त्यांच्या आर्थिक नाड्याच उद्ध्वस्त करण्यास मनोज सिन्हा यांनी द्विवेदी यांना सांगितले. दरम्यान, लष्करप्रमुख जम्मू-कश्मीरमध्ये असताना पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.