
मुंबई, दि. 25 (वृत्तसंस्था)- हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटयुद्धाकडे नेहमीच अवघ्या जगाचे वेधले जाते. मात्र पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय संघांतील वातावरण प्रचंड तापलेय आणि या हल्ल्यानंतर आयसीसी असो किंवा आशियाई क्रिकेट स्पर्धा, पुठेही साखळीत हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटयुद्ध नकोच, असे विनंती पत्र बीसीसीआयने आयसीसीला लिहिले असल्याची जोरदार चर्चा आहे. हे वृत्त अधिपृत नसले तरी आगामी स्पर्धांत हे क्रिकेटयुद्ध साखळीत होऊ नये याबाबत गांभिर्याने चर्चेला सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून कळले आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात गेले दीड दशक एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळविण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानात खेळण्यास पेंद्र सरकारने परवानगी नाकारल्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळविण्यात आली होती. त्यानुसार हिंदुस्थानचे सामने दुबईत खेळविण्यात आले होते. हिंदुस्थानी संघाच्या नकारामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या आयोजनाला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र दुबईत झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याने स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम रचला होता.
दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करा, क्रिकेट परंपरेला नको
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेले पृत्य निंदनीय आहे. ज्या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ला केलाय, त्यांचा खात्मा करायलाच हवा. पण जागतिक पातळीवर साखळी स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान सामना नको, हा अट्टहास नको. त्या घटनेचा आणि क्रिकेटचा काडीचाही संबंध नाही. आपल्या इथे क्रिकेटला खूप मोठी परंपरा आहे आणि पाकिस्तान आपला पारंपरिक वैरीसुद्धा आहे. उभय संघांतील क्रिकेटयुद्ध पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी मोठय़ा उत्साहात पुठेही पोहोचतात. हीच या युद्धाची खरी जादू आहे. या युद्धामुळे आयोजकांना पैसा मिळतोच, पण आपली क्रिकेट परंपराही वृद्धिंगत होतेय. विशेष म्हणजे, या क्रिकेटयुद्धात नेहमीच क्रिकेटचा विजय होतोय. बंधुभावाचा विजय होतोय. त्यामुळे जागतिक पातळीवर जितके शक्य आहे तितके क्रिकेटचे हे प्रेम वाढायलाच हवे. आयसीसीच्या कोणत्याही अंतिम फेरीत दोन्ही संघ पोहोचतीलच असे नाही. त्यामुळे दोन्ही संघ एकाच गटात असतील तर दोघांमध्ये किमान एक साखळी सामना तर निश्चितच होणार. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात खेळणे हे क्रिकेटच्याच हिताचे आहे. हिंदुस्थानच्या खिलाडू वृत्तीमुळेच आजवर हे क्रिकेटयुद्ध शक्य झालेय आणि ते पुढेही व्हावे हे माझे स्पष्ट मत आहे. खेळात राजकारण कधीच आणू नये.
नदीम मेमन, प्रसिद्ध पिच क्युरेटर
दहशतवादी राष्ट्राशी कसलेच संबंध नको
पुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेटबाबत पुणीही सहानुभूती बाळगूच नये. पाकिस्तान आपला पक्का वैरी आहे. त्यांचे दहशतवादी आपल्या देशांवर वारंवार हल्ले करत आहेत.
आपले सरकार याचा बदला घेईलच. पण अशा दहशतवादी राष्ट्राशी कसलेच संबंध नको. त्यांच्याविरुद्ध कसलीच खिलाडू वृत्ती दाखवू नये. त्यांनी केलेल्या हल्ल्याला माफी नाही.
राजू महागावकर, क्रिकेटप्रेमी
…ही तर सोन्याची अंडी देणारी कोंंबडी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षे कोणतीही मालिका होत नाही. त्यामुळे हे संघ केवळ आयसीसी किंवा आशिया स्पर्धेतच एकमेकांशी भिडतात. परिणामतः या लढतींना युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले असते आणि हे युद्ध पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी मोठय़ा संख्येने सामना पाहायला पुठेही पोहोचतात. या सामन्याच्या माध्यमातून अब्जावधींची उलाढाल होत असल्यामुळे आयोजक आणि आयसीसीसाठी हा सामना सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरतोय. हा सामना आर्थिकदृष्टय़ाच नव्हे, तर क्रिकेटलाही जगाच्या कानाकोपऱयात पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतोय. त्यामुळे हे युद्ध सर्वांना हवेहवेसे वाटतेय. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या लढतीवर परिणाम होणार की नाही याबाबत क्रिकेट दिग्गजांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
आशिया चषकात काय होणार?
येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानातच आशिया चषक स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतही हिंदुस्थान-पाकिस्तान हे एकाच गटात असण्याची शक्यता आहे. उभय संघातील लढती हायब्रिड मॉडेलनुसार श्रीलंका किंवा दुबईत खेळविल्या जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिया चषकात उभय संघ दोनदा भिडतील, असा कार्यक्रम आयोजकांकडून आधीच तयार केला गेला आहे. त्यामुळे उभय संघांना एकाच गटात भिडवू नये, असे पत्र बीसीसीआयने लिहिल्याची निव्वळ अफवा भासत आहे. सत्य काय आहे ते येत्या काही दिवसांत समोर येईलच. तसेच याच वर्षी महिलांचे वनडे वर्ल्ड कप खेळविले जाणार असून यात पाकिस्तानी संघाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेतही हिंदुस्थान-पाकिस्तान एकाच गटात भिडण्याची शक्यता आहे.