
काही आरोपांबाबत कागदपत्रे अपुरी असल्याचे स्पष्ट करत नॅशनल हेराल्ड मनी लॉण्डरिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना नोटीस बजावण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवर विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. कायद्यातील नवीन तरतुदींनुसार आरोपींचे म्हणणे ऐकल्याशिवाय तक्रारीची दखल घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने बजावले. या प्रकरणी आरोपींना नोटीस पाठविण्याची मागणी ईडीने केली होती. ईडीने 9 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केले होते.
आरोपपत्रातील काही कागदपत्रे गहाळ आहेत. ईडीने ती दाखल करावीत. त्याबाबत समाधान झाल्यास नोटीस जारी केली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी 2 मेपर्यंत पुढे ढकलली.