
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षात आणखी तीन नव्या पाहुण्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज पेंग्विन दिनानिमित्त नवजात पेंग्विनला नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावे देत त्यांचा नामकरण समारंभ साजरा करण्यात आला. दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन्सची एकूण संख्या 21 वर पोहोचली आहे. यात 11 नर आणि 10 मादी पेंग्विनचा समावेश आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात 18 मार्च 2017 रोजी आणले. त्यासाठी अद्ययावत असा विशेष पेंग्विन कक्ष बनवण्यात आला. पेंग्विनमुळे पर्यटकांची गर्दी वाढली. हिंदुस्थानातील पहिली हम्बोल्ट पेंग्विन सुविधा त्यांच्या जैविक, वर्तणूक आणि शारीरिक आवश्यकता विचारात घेऊन विकसित करण्यात आली.