अर्थवृत्त – नेस्लेची पार्टनरशिप, अरिहंत अ‍ॅकॅडमी, मिरे अॅसेट ग्लोबल अलोकेशन फंड

जागतिक पृथ्वी दिनाआधी नेस्ले इंडियाने हिमाचल प्रदेशातील पालमपूर आणि डलहौजी या शहरांत प्रोजेक्ट हिलदारी प्रोजेक्टला प्रोत्साहन दिले. प्लान फाऊंडेशन आणि रेसिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली. या वेळी नेस्ले इंडियाचे अध्यक्ष सुरेश नारायणन आणि प्लान फाऊंडेशनच्या संचालिका नेहा शशिकुमार उपस्थित होत्या. गेल्या पाच वर्षांत प्रोजेक्ट हिलदारीने देशातील काही निवडक पर्यटन शहरांत कचरा व्यवस्थापनासाठी मॉडल यशस्वी केले. सध्या पोंडा, मसुरी, महाबळेश्वर, मुन्नार, दार्जिलिंग, डलहौजी, पालमपूर, पंचगनी आणि जुनागढमध्ये ही योजना सुरू आहे. ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत प्रोजेक्ट हिलदारीने जवळपास 47 हजार मेट्रिक टन कचरा यशस्वीपणे हटवला आहे.

अरिहंत अ‍ॅकॅडमी

अरिहंत अ‍ॅकॅडमीकडून एनएसई अ‍ॅकॅडमीसोबत सहयोगाने फिनटेक अॅनालिटिक्स प्रोफेशनल्स (एफएपी) प्रोग्राम लाँच केला. या वेळी अरिहंत अपॅडमीचे सह-संस्थापक व अध्यक्ष उमेश पंगम आणि एनएसई अ‍ॅकॅडमीचे सहयोगी उपाध्यक्ष रंगनाथन एस उपस्थित होते. हा सर्टिफिकेशन प्रोग्राम दोन वर्षांचा आहे. एफएपी प्रोग्राममध्ये खास अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना फिनटेक क्षेत्रातील संरचित इंटर्नशिप संधींमधून फायदा मिळेल. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिस्ट, रिस्क मॅनेजरसाठी उपयोगी आहे.

मिरे अॅसेट ग्लोबल अलोकेशन फंड

मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या आयएफएससी शाखेला मिरे अॅसेट ग्लोबल अलोकेशन फंड आयएफएससी आणत असल्याची घोषणा केली. या वेळी मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्पादने, व्यवसाय धोरण व आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे प्रमुख वैभव शाह उपस्थित होते. हा एक ‘आऊटबाउंड फंड’ आहे. गुंतवणूकदार प्रति व्यक्ती, प्रति आर्थिक वर्ष 250 हजार एलआरएस मर्यादेमध्ये या फंडांत गुंतवणूक करू शकतात. आपल्या निव्वळ मालमत्ता मूल्यापैकी (एनएव्ही) 90 ते 100 टक्के अनेक न्यायक्षेत्रांखालील जागतिक ईटीएफ्समध्ये गुंतवून जागतिक बाजारांमधील संधींचा लाभ घेण्याचे लक्ष्य मिरे अॅसेट ग्लोबल फंडाने ठेवले आहे.

जोयआलुक्कासची ऑफर

क्षय्य तृतीयानिमित्त ज्वेलर जोयआलुक्कासतर्फे ऑफर जाहीर करण्यात आली. 1 मे 2025 पर्यंत दागिने खरेदी करणाऱया ग्राहकांना दागिन्यांवर आकर्षक ऑफर मिळणार आहे. जोयआलुक्कास अॅडवॉन्स प्री-बुकिंगवर ऑफरसुद्धा देत आहे. समृद्धी योजनेद्वारे अक्षय्य तृतीया साजरी करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, असे जोयआलुक्कास ग्रुपचे चेअरमन जोयआलुक्कास म्हणाले. 75 हजार किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या हिऱयांच्या, अनकट हिऱयांच्या, प्लॅटिनमच्या दागिने खरेदी करणाऱया ग्राहकांना 24 पॅरेट 500 एमजी सोन्याचा बार मोफत देणार आहे.

रियलमीचे फोन लाँच

स्मार्टफोन कंपनी रियलमी कंपनीने रियलमी नार्झो 80 प्रो 5 जी आणि रियलमी नार्झो 80 एक्स 5 जी हे दोन फोन लाँच केले. नार्झो एक्स 5 जी फोनची किंमत 11,999 रुपये, तर नार्झो प्रोची किंमत 17,999 रुपये आहे. हे दोन्ही फोन 5 जी आहेत.

ईडीआयआय दिवस

भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) ने 20 एप्रिल 2025 रोजी आपला 43 वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉ. पिरोज खंबाटा, सुनील अंचिपाका, दिनेश सिंग रावत उपस्थित होते.

मेफेअर हाऊसिंग

मेफेअर हाउसिंगने ‘मेफेअर विरार गार्डन्स’ या टाऊनशिपमधील 500 घरांचा ताबा एका दिवसात देत रिअल इस्टेट क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली. या वेळी मेफेअर हाऊसिंगचे संचालक आदित्य नयन शहा उपस्थित होते. विरार गार्डन्स टाऊनशिपच्या चार टप्प्यांमध्ये 2,000 कुटुंबे वास्तव्यास आहे.

शंतनू महेश्वरीची भेट

अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचा लोकप्रिय शो ‘कॅम्पस बीट्स’मधील अभिनेता व डान्सर शंतनू महेश्वरी नुकताच अॅमेझॉन पॅकेजची डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी सहयोगी हर्ष बनातशी सामील झाला आणि हर्ष ‘कॅम्पस बीट्स’च्या सर्व कलाकारांना भेटला.

आयआयटी मुंबई-इंडस टॉवर्सची भागीदारी

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई आणि इंडस टॉवर्स लिमिटेडने शाश्वत ऊर्जेतील दोन संशोधन उपक्रमांसाठी एका करारावर स्वाक्षरी केली. हे संशोधन सौर ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवणूक यांमध्ये प्रगती करण्यावर केंद्रित असेल, ज्याचा उद्देश दूरदृष्टीचे आणि व्यवहार्य उपाय तयार करणे आहे. हा उपक्रम इंडस टॉवर्सच्या ‘प्रगती’ या प्रमुख काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमाचा भाग आहे. या वेळी इंडस टॉवर्सचे एमडी प्रचुर साह व आयआयटीचे प्रा. रवींद्र गुडी उपस्थित होते.

टॉमी हिलफिगर मुंबईत दाखल

टॉमी हिलफिगर या पीव्हीएच काॅर्पोरेशनचा भाग असलेल्या ब्रँडने टॉमी हिलफिगर यांच्या भारतातील मुंबई भेटीची माहिती दिली. हिलफिगर यांनी 15 एप्रिल 2025 रोजी मुंबईत वांद्रे- पुर्ला काॅम्प्लेक्स या मुंबईतील लक्झ्युरी शॉकिं भागात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथील टॉमी हिलफिगरच्या स्टोअरला भेट दिली. सारा-जेन डायस आणि बॉलीवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर यांच्यासोबत हिलफिगर यांची अमेरिकन व भारतीय फॅशन संस्पृतीवर चर्चा झाली. या वेळी करण जोहर, सारा अली खान, इब्राहिम अली खान उपस्थित होते.

फोनपेतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त ऑफर

फोनपेने अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने 24 पॅरेट डिजिटल सोने खरेदीवर आकर्षक कॅशबॅक ऑफर्सची घोषणा केली. युजर्सनी फोनपे प्लॅटफॉर्मवर किमान 2 हजार रुपये किमतीचे डिजिटल सोने खरेदी केल्यावर फ्लॅट 1 टक्के (कमाल 2 हजारांपर्यंत) कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर फक्त 30 एप्रिल रोजी एकदाच होणाऱया व्यवहारासाठी लागू आहे (प्रत्येक युजरसाठी एकदाच वैध). युजर्स यूपीआय, यूपीआय लाइट, व्रेडिट-डेबिट कार्ड, वॉलेट, गिफ्ट कार्डस्सारखे विविध पेमेंट मोड्स वापरून ही खरेदी करू शकतात.