
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुंबईतील पेडर रोडवरील तैलचित्र गेल्या सहा दिवसापासून अंधारात आहे. या तैलचित्राच्या देखरेखीचे काम मुंबई महापालिकेतील डी विभागाकडे आहे. तैलचित्रावरील ’मेरी आवाज ही पहचान है’ याकडे अनेकांचे लक्ष जात होते. परंतु, अंधारामुळे ते वाचणेही मुश्किल झाले आहे. महापालिका अधिकाऩयांचे याकडे लक्ष जाईल का?, असा सवाल आता विचारला जात आहे.