
इंडिगो एअरलाइन्सने पाकिस्तानकडून एयरोस्पेस बंद करण्यात आल्यानंतर आपल्या प्रवाशांसाठी एक ट्रव्हल अधिसूचना काढली आहे. ज्या प्रवाशांनी तिकीट रद्द केली आहेत, त्या प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार असून रिशेडय़ुलिंगची सुविधा दिली जाणार आहे, असे इंडिगोने म्हटले आहे. पाकिस्तानने एयरोस्पेस बंद केल्याने काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना याचा फटका बसला आहे. आमची टीम यावर काम करत आहे. प्रवाशांना सर्वश्रेष्ठ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.