
अलीगढमधील एका तरुणाच्या खिशात असलेल्या आयफोन 13 चा अचानक स्पह्ट झाल्याची घटना समोर आली. तरुणाने काही दिवसांपूर्वीच हा फोन खरेदी केला होता. खिशात फोनचा स्फोट झाल्याने हा तरुण होरपळला आहे. कॅन्टच्या खिशात गरम जाणवू लागल्याने त्याने फोन बाहेर काढला. फोनमधून अचानक धूर येऊ लागला. फोनला बाजूला फेकताच त्याचा स्फोट झाला. फोनचा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. नवा फोन असल्याने कंपनीने दुसरा फोन बदलून द्यायला हवा, अशी मागणी तरुणाने केली आहे. तरुणाने स्फोट संबंधीची माहिती आयफोनच्या कस्टमर केअरला दिली आहे. याप्रकरणी पोलीसही तपास करत आहेत.