कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदरात कपात

कोटक महिंद्र बँकेने खातेदारांना जोरदार झटका दिला. बँकेने बचत खात्यावर मिळणाऱया व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक बँकेने 50 हजार ते 5 लाखांपर्यंत दैनंदिन बॅलेन्सच्या बचत खात्यावर मिळणाऱया व्याजदरात कपात केली आहे. नवीन दर 25 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. बचत खात्यातील 50 लाखांपर्यंतच्या डेली बॅलेन्सवर आता 2.75 टक्के प्रति वर्ष व्याज मिळणार आहे, तर 50 लाखांपेक्षा जास्त डेली बॅलेन्सवर 3.25 टक्के प्रति वर्ष व्याज मिळणार आहे. याआधी ऑक्सिस बँकेसोबत एचडीएफसी बँकेने, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर कमी केले आहेत.