
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या कारवाईमुळे पाकिस्तनामध्ये घबराट निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी कुटुंबाला परदेशात पाठवले आहे. ‘एबीपी न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी विमानाने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 48 तासांच्या आत गुरुवारी हिंदुस्थानने युद्धनौका आयएनएस सूरत वरून क्षेपणास्त्र चाचणी केली. ज्यामुळे शत्रू राष्ट्रांना कडक संदेश गेला आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. देशातील सर्व राजकीय पक्षही या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत आहेत. आता सरकार यावर पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.