
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट्ट यांचा मुलगा आणि पूजा भट्ट हिचा मोठा भाऊ राहुल भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुलने कुटुंबाशी संबंधित अनेक गौप्यस्फोट केले आहे. एवढेच नाही तर पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्यात कोण सरस आहे हे देखील राहुलने सांगितले. तसेच पूजा भट्ट आणि तिचे वडील महेश भट्ट यांच्यातील लिप किस फोटोवरही त्याने पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
पूजा भट्ट आणि महेश भट्ट या बाप-बेटीचा लिक लॉक किस व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. बाप-बेटीच्या नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार असल्याची टीका दोघांवर झाली होती. आता यावर राहुल भट्ट याने प्रतिक्रिया दिली आहे. हा फोटो प्रसिद्ध झाला तेव्हा मी फक्त 14 वर्षांचो होतो, असे राहुलने सांगितले.
फिल्मी कुटुंबातील मुले एकतर खूप त्रासलेले असतात किंवा मनाने खंबीर असतात. त्यामुळे मला असा गोष्टींची पर्वा नाही. कारण सत्य काय आहे ते आपल्याला माहिती आहे. आम्ही लहानणीपासून हे पाहत आलो आहोत, असे राहुल म्हणाला.
जेव्हा लहानपणापासून जीवे मारण्याच्या धमक्या, आयकर विभागाचे छापे, निदर्शने, मारामारी पाहायला मिळते तेव्हा तुम्हाला काय वाटते यामुळे काय परिणाम होईल? लोकांना वाटत असेल आम्ही खूप काळजीत आहोत. पण हे बदकाच्या पाठीवरून पाणी काढण्यासाखरेच आहे, असे राहुल म्हणाला. सावत्र बहिण आलिया आणि सख्खी बहीण पूजा यांच्याच बरेच अंतर आहे. पीआरचा वापर कसा करायचा हे आलियाला चांगले माहिती आहे. पण पूजापुढे ती पाणी कम चाय आहे, असेही तो म्हणाला.
दरम्यान, राहुल भट्ट हा महेश भट्ट यांची पहिली पत्नी किरण भट्टचा मुलगा आहे. पूजा भट्ट हिचा तो मोठा भाऊ आहे. तर आलिया भट्ट ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान हिची मुलगी आहे. आलियाला सख्खी बहीणही असून तिचे नाव शाहीन आहे. तर राहुल भट्ट हा तिचा सावत्र भाऊ असून तो फिटनेस ट्रेनर आहे. बिग बॉसच्या चौथ्या हंगामात तो दिसला होता.