आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना आपापल्या राज्यात पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करायला सांगितली आहे. तसेच ही यादी केंद्र सरकारकडे देण्याचे आदेश दिले आहे.

22 एप्रिल रोजी पहलगमामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता केंद्र सरकारने राज्यांना आदेश दिले आहेत. आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करून ती केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे कामाला प्राथमिकतेने करण्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द केला आहे. पण मेडिकल विजा 29 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.