Pahalgam Attack – लष्कराची मोठी कारवाई, संशयित दहशतवाद्यांच घर IED स्फोटानं उडवलं

जम्मू -कश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली. यानंतर हिंदुस्थानी तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे रेखाचित्रं आणि फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या तपासाला वेग आला आहे. अशातच आता हल्ल्यातील दोन संशयित दहशतवद्यांचे नाव समोर आले असून त्याच्या घराची झडती घेण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान जात असताना घरात स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आसिफ शेख आणि आदिल गुरी असे त्या संशयित दहशतवाद्यांचे नाव आहे. सुरक्षा दलाचे दवान आणि जम्मू कश्मीरचे पोलीस मिळून आसिफ शेखच्या घराची झडती घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना आसिफच्या घरात अनेक स्फोटक वस्तू आढळल्या. यावेळी लष्कराचे जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून दोन संशयित दहशवाद्यांचे घर IED स्फोटाने उडवले असल्याची माहिती आहे. मात्र लष्कराच्या जवानांना आणि पोलिसांना कोणतीही हानी झालेली नाही.

हिंदुस्थानी लष्करप्रमुख श्रीनगर-उधमपूरला भेट देणार –

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगर आणि उधमपूरला भेट देणार आहेत. उपेंद्र द्विवेदी सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील.