
पाहुणचारासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्याच्या सुतारवाडीत चार हेलिपॅड उभारण्यात आले होते. यासाठी सरकारी तिजोरीतून जवळपास तब्ब्ल दीड कोटींचा खुर्दा पाडण्यात आला होता. याबाबत दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करत सरकारला जाब विचारला. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने हॅलिपॅडचे कंत्राटच रद्द करून अंग काढले आहे. मात्र ‘गीताबागे’तील पाहुणचार घेऊन शहा यांनी ‘ढेकर’ दिल्यानंतर हेलिपॅडचे कंत्राट रद्द केल्याने झालेल्या खर्चाची वसुली आता कुणाच्या खिशातून करणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी गेले. यासाठी रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे कार्यक्रमानंतर शहा सुनील तटकरे यांच्या घरी तब्ब्ल दीड कोटींचा खुर्दा करून चार हेलिपॅड उभारले होते. मात्र जेवणावळीसाठी गेलेल्या शहांसाठी सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याने हा पाहुणचार सरकारला चांगलाच महागात पडल्याची चर्चा होऊ लागली. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. तसेच दैनिक ‘सामना’ने 19 एप्रिल रोजी ‘अमित शहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटींचा खुर्दा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील कार्यकारी अभियंत्यांनी हेलिपॅडची निविदाच रद्द केल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अधिकाऱ्यांनो याचे उत्तर द्या..
तटकरे यांचा पाहुणचार करून अमित शहा गेल्यानंतर बांधकाम खात्याने हेलिपॅडची निविदा रद्द केली. मात्र दीड कोटी रुपये खर्चुन हेलिपॅड तर उभारण्यात आले होते. त्यामुळे झालेला हा खर्च आता नेमका कुणाच्या खिशातून वसूल करणार याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे अन्यथा या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई कारवी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान याबाबत बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी मिटिंगच्या नावाखाली वेळ मारून नेत उत्तर दिले नाही