
कश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेकडूनही मुंबईसह राज्यभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला, तर हा हल्ला रोखू न शकणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारण्यात आला.
शिवसेना विभाग क्रमांक 3 तसेच जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या वतीने जोगेश्वरी स्थानक पूर्व येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार अनंत (बाळा) नर, उपनेत्या शीतल देवरुखकर, विभाग संघटक शालिनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुहास वाडकर, विश्वनाथ सावंत, रवींद्र साळवी, प्रशांत कदम, दीपक सुर्वे, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, सुगंधा शेटये, संजय सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने गोल देऊळ कुंभारवाडा येथे दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करत सह्यांची मोहीम राबवली. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर उपस्थित होते.
वांद्रे पश्चिम विधानसभेतील शाखा क्र. 99 खारदांडा गझधरबंधच्या वतीने खारदांडा कोळीवाडा येथे दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. उपविभागप्रमुख चिंतामणी निवाटे, शाखाप्रमुख पांडुरंग वाघे, शाखा संघटक प्रभा पाटील यांच्यासह नागरीकांनी निषेध केला.
घाटकोपर पश्चिम येथे विभागप्रमुख तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांच्या भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, विधानसभा प्रमुख सुभाष पवार, संजय चव्हाण, उपविभागप्रमुख सुनील मोरे, विलास पवार, अजित गुजर, विधानसभा समन्वयक इम्रान शेख, गणेश वाव्हळ, माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे, समीक्षा सक्रे, शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे सचिव सचिन भांगे यांच्यासह तिन्ही विधानसभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विक्रोळी विधानसभेच्या वतीने आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. यावेळी कामगार नेते बाबा कदम, माजी आमदार रमेश कोरगावकर, विभाग संघटक राजेश्वरी रेडकर, सिद्धी जाधव, रश्मी पावडर, शेखर जाधव, नीलेश साळुंखे, दीपक सावंत आदी मोर्चात सहभागी झाले होते.
लालबागमधील भारतमाता येथे शिवसेना विभाग क्रमांक 11 च्या वतीने हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, विधानसभा समन्वयक बबन गावकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख किरण तावडे, मिनार नाटळकर यांच्यासह शिवडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते.
दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली काहण्यासाठी व या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना विभाग क्रमांक 9 च्या वतीने विभागप्रमुख प्रमोद शिंदे व विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द स्टेशन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक निमिष भोसले, महेंद्र नावटे, विधानसभाप्रमुख निधी शिंदे, माजी नगरसेवक, अनिल पाटणकर, स्मिता गाककर, नीलम डोळस, विधानसभा संघटक सुमित्रा नेमाडे, शाखाप्रमुख किरण सावंत यांच्यासह शिवाजी गावडे, विनायक म्हात्रे, संदीप भोईर, अमित शिंदे, गजानन पाटील, प्रभाकर भोगले, किरण लोहार, प्रशांत म्हात्रे, आनंद जाधव, विनायक तांडेल आदी उपस्थित होते.
विभाग क्र. 10च्या वतीने विभागप्रमुख आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली दादर यंथे निषेध करण्यात आला. या वेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, विभाग संघटक शशी पडते, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, यशवंत विचले, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख अजित कदम, संजय भगत, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी तसेच सर्वसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.