पाकिस्तानी रेंजर्सनी बीएएसएफ जवानाला पकडले

हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दलाचे जवान पी. के. सिंग यांनी बीएसएफ चौकी जलोके दोनाजवळील शून्य रेषा चुकून ओलांडली आणि पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. त्यांना पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले. पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

हल्ल्यानंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयात सेलिब्रेशन

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानी लष्करी राजदूतांना देश सोडण्याची नोटीस बजावली. त्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एक व्यक्ती केक घेऊन जाताना पहायला मिळाला. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीयो व्हायरल झाला असून एक व्यक्ती हातात बॉक्स घेऊन जाताना या व्हिडीओत दिसत आहे.

पाकिस्तानची टरकली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकडय़ांना धडा शिकवताना मोठी राजनैतिक कोंडी केली. त्यातील महत्त्वाच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानची टरकली आहे. हे तर युद्धाला चिथावणी देणारे कृत्य असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे.

लष्करप्रमुख आज श्रीनगरमध्ये

हिंदुस्थानचे लष्करप्रमुख उकेंद्र द्विवेदी उद्या शुक्रवारी 25 एप्रिल रोजी श्रीनगरला भेट देणार आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षा व्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत. स्थानिक लष्करी तुकडय़ांचे वरिष्ठ कमांडर जनरल द्विवेदी यांना सुरक्षा व्यवस्था तसेच कश्मीर आणि नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या शोधमोहिमेची माहिती देतील.

रिलायन्स फाऊंडेशनकडून पीडितांवर मोफत उपचार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहलगाम हल्ल्याबाबत तीव्र दुŠख व्यक्त केले आहे. तसेच हल्ल्यातील जखमींवर रिलायन्स फाऊंडेशनकडून मोफत उपचार देण्याची घोषणाही केली आहे.