नांदोस कट्टा येथे वैद्यकीय सेवा

श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली माता यशोदा परिवारातर्फे नांदोस कट्टा येथील मधलीवाडी येथे पंचक्रोशीतील स्थानिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. यामध्ये दुखापत अथवा बँडएड पट्टी, रीलीफ स्प्रे, विक्स, बाम, आयोडेक्स आदी प्रथमोपचार साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स ब्लडप्रेशर तपासणी मशीन, व्हील चेअर, स्ट्रेचर आदी साहित्य उपलब्ध करून दिल्याची माहिती गणेश पार्टे आणि रत्नकांत काळसेकर यांनी दिली.