
उन्हाळ्याची तीव्रता वाढली असतानाच पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकलचा गोंधळ गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिला. तांत्रिक कारणांमुळे दिवसभरात एसी लोकलच्या 11 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसी लोकलची योग्य देखभाल ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे यातून उघड झाले आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. पश्चिम रेल्वेने बुधवारी एसी लोकलच्या 13 फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यापाठोपाठ गुरुवारी 11 फेऱ्या रद्द करून त्याजागी नॉन एसी लोकल चालवण्यात आल्या.