
मोबाईलच्या जमान्यात रील्स करण्याचे वेड सगळ्यांना असते. छोटे क्लिप किंवा फोटो एकत्र करून व्हिडीओ तयार केले जातात. काही जण लॅपटॉपवर, तर काही मोबाईलवर व्हिडीओ एडिट करतात. या सगळ्याचा विचार करून इन्स्टाग्रामने व्हिडीओ एडिट करणाऱयांसाठी ऍप आणलंय. मेटाने टिकटॉकच्या कॅपकटप्रमाणेच ‘एडिट्स’ हे व्हिडीओ एडिटिंग ऍप सादर केले. ‘एडिट्स’ हे मोफत ऍप आहे. या ऍपवर आपली क्षणचित्रे इन्स्टाग्राम रील्समध्ये रूपांतरित करण्यासाठी विविध फीचर मिळतात. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी ते उपलब्ध असेल. जानेवारीमध्ये अमेरिकेने टिकटॉक आणि कॅपकटवर बंदीची घोषणा केली तेव्हा मेटाने पहिल्यांदाच एडिट्स लाँच करण्याची घोषणा केली. कॅपकट ऍप हिंदुस्थानात नाही, पण अमेरिकेतील युजर्समध्ये लोकप्रिय ऍप आहे.