
युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वाढवण्यासाठी व्हॉट्सऍप नवीन फीचर घेऊन येतंय. फीचरच्या माध्यमातून युजर्सना आणखी चॅट प्रायव्हसी मिळेल. ‘ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी’ असे या फीचरचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी दिसलेले हे फीचर आता आयओएस युजर्सकडे दिसले. डब्ल्यूएबीटाइन्फोच्या नवीन रिपोर्टनुसार, हे नवीन प्रायव्हसी फीचर ऑक्टिव्हेट करताच पर्सनल व ग्रुप अशा दोन्ही चॅटवर ऍडव्हान्स लेव्हल चॅट प्रायव्हसी मिळेल. यामुळे कोणत्याही चॅटमध्ये तुम्ही पाठवलेल्या मीडिया फाईल्स जसे की, फोटो व व्हिडीओ त्यांच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करू शकणार नाहीत. तसेच तुमच्या चॅटला मेटा एआय प्रश्न विचारता येणार नाहीत. रिपोर्टमध्ये या फीचरचा एक स्क्रीनशॉटदेखील शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, हे फीचर कसं वापरता येईल. सध्या ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी फीचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा वापर करता येणार नाही. टेस्टिंगदरम्यान हे फीचर पूर्णपणे बग फ्री आहे की नाही, याची खात्री केली जाईल. त्यानंतर हे सर्व युजर्ससाठी अधिकृतपणे रोलआऊट केले जाईल आणि युजर्सना ते वापरता येईल.