बाकरवडी आता होणार ‘मिनी’

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची चव केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. अशा काही खास खमंग पदार्थांपैकी एक पदार्थ आहे बाकरवडी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा या बाकरवडीची चव देशाच्या कानाकोपऱ्यात चाखायला मिळते. आता हीच बाकरवडी मिनी रूपात चाखायला मिळणार आहे.

घरी क्रिकेट बघताना किंवा सिनेमाचा आनंद घेताना आता समोसे, वेफर्स आणि पॉपकॉर्न सारख्या पदार्थांबरोबर बाकरवडीला देखील मागणी असते.

सध्या आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरमध्ये मिनी बाकरवडी क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे.