
जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर आज केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते त्यात सहभागी झाले होते. सर्वपक्षीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत की, “सरकारच्या प्रत्येक अॅक्शनला आमचं समर्थन आहे.”
केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आहे.