
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृत पर्यटकांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुकेश अंबानी यांनी एक निवेदन जारी करत मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले मुकेश अंबानी?
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदुस्थानींच्या मृत्युप्रकरणी रिलायन्स कुटुंबातील सर्वजण शोकात सहभागी आहेत. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेले नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच मुंबईतील आमचे रिलायन्स फाउंडेशन सर एचएन हॉस्पिटल सर्व जखमींना मोफत उपचार देईल.
दहशतवादाचे कुणीही समर्थन करू नये. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही माननीय पंतप्रधान, हिंदुस्थान सरकार आणि देशासोबत आहोत, असे मुकेश अंबानी म्हणाले.