
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत पाकिस्तानबाबत 5 मोठे निर्णय घेतले. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या हल्ल्याबाबत नवीन खुलासे होत आहेत. त्यातच हा हल्ला का आणि कोणी केला, याबाबातची मोठी मोहिती पाकिस्तानातूनच मिळत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाल्याची धक्कादायक माहिती पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकाराने दिली आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आदिल राजा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
आदिल राजा हे पाकिस्तानचे एक वरिष्ठ पत्रकार आहेत आणि ते ह्यूमन राईट्स वॉचसाठी काम करतात. त्यांनीच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. असीम मुनीर यांनी पहलगाममध्ये जाणूनबुजून हल्ला घडवून आणला. त्यामुळे त्यांना होत असलेला विरोधाची धार बोथट करण्याचा आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू आहे, असे राजा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
जेव्हा मी ही पोस्ट शेअर करेन तेव्हा मला लोक नक्कीच हिंदुस्थानचा एजंट म्हणतील. मात्र हे सत्य आहे की पहलगाम हल्ला मुनीरच्या आदेशावरून झाला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे ऑफ द रेकॉर्ड सांगितले आहे. मुनीरने प्रथम परदेशी पाकिस्तानींना बोलावले आणि चिथावणीखोर विधाने केली. यानंतर त्यांनी पहलगाममध्ये हल्ला घ़डवून आणला. मात्र आता मुनीरच्या चुकीचे परिणाम संपूर्ण पाकिस्तानला भोगावे लागतील. शाहबाज यांनी मुनीर यांना तात्काळ पदावरून हटवावे अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल, असे आदिल राजा याने म्हटले आहे.
Pahalgam Terrorist Attack – ‘या’ Mobile App च्या मदतीने केले दहशतवादी हल्ले
पत्रकार आदिल राजा कोण आहे?
पेशावरचा रहिवासी असलेले आदिल राजा हा पाकिस्तानचा ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यांनी आपले शिक्षण इस्लामाबाद येथील कायद-ए-आझम विद्यापीठातून घेतले. आदिल गेल्या 17 वर्षांपासून पाकिस्तानी पत्रकारितेत कार्यरत आहे. सध्या ते ‘सोल्जर्स की सुनो’ नावाचा ब्लॉग चालवतो. आदिलचे सोशल मीडियावर 16 लाख फॉलोअर्स आहेत.
‘बंदूकें भिजवा दी हैं, …’, खेचर मालकांचा फोनवर संवाद, मॉडेल एकता तिवारीने सांगितला थरारक अनुभव