हिंदुस्थानच्या कारवाईच्या भीतीने पाकडे टरकले; क्षेपणास्त्र चाचणीला सुरुवात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. घटनेनंतर तातडीने कॅबिनेट सुरक्षा यंत्रणेची बैठक घेण्यात आली या बैठकीत पाकिस्तानच्या सिंधू कराराला स्थगिती देण्यात आली. याशिवाय पाकिस्तानींना पुढील 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान हिंदुस्थानने घेतलेल्या या कठोर निर्णयांमुंळे पाकड्यांचे धाबे दणाणले आहेत. हिंदुस्थानने घेतलेले निर्णय पाहता लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली आहे.

दरम्यान, हिंदुस्थानच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने आता क्षेपणास्त्र चाचणी घेणार आहे.  पाकिस्तानने अरबी समुद्राच्या क्षेत्रात क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र असेल. दरम्यान याची चाचणी 24- 25एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावर केली जाईल.त्यामुळे हिंदुस्थानी तपास संस्था या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत, गृह मंत्रालयातील गृह सचिवांसोबत रॉ आणि आयबी प्रमुखांची मोठी बैठक होत आहे.

पाकिस्तानची झोप उडाली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले असून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे. ठिकठिकाणी पाकचे झेंडे जाळून निदर्शने केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तान देखील दोन दिवसांपासून दहशतीखाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुस्थान आपल्याला संपवण्याच्या तयारीत असून, गेल्यावेळसारखा पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले…

  • पाकिस्तानचे पाणी तोडले.
  • सिंधू करार स्थगित.
  • आगामी सर्व व्हिसा रद्द.
  • अटारी सीमेवरील संयुक्त चेकपोस्ट तत्काळ बंद.
  • दूतावासातील सल्लागारांना देश सोडण्याचे फर्मान.
  • इस्लामाबादच्या दूतावासात कर्मचारी कपात केली.
  • पाकिस्तानींनो 48 तासांत देश सोडा.