
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेची सुरक्षा धोक्यात असून यात्रेकरूंना कडक सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दोन मिनिटे उभे राहून आणि मौन पाळून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.