
अक्षय्य तृतीयेला अवघे काही दिवस उरले असताना सोन्याच्या भावात अचानक घसरण झालीय. एक लाखाच्या पार पोहोचलेले सोने बुधवारी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी चांदीच्या भावात मात्र कोणतीही घसरण झाली नाही. सराफा बाजारात बुधवारी 22 पॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 90 हजार 300 रुपये, तर 24 पॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 98 हजार 500 रुपये असा होता. मुंबईत 22 पॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 90,150 रुपयांवर पोहोचला आहे.