
ब्रँडेड घडय़ाळ, लग्झरी बॅग, बूट आणि चष्मा खरेदी करणे महाग झाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने एक नवीन यादी प्रसिद्ध केली असून यात काही लग्झरी वस्तूंवर एक टक्का टीसीएस लावला आहे. हा नियम 22 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आला आहे. नव्या यादीनुसार लग्झरी घडय़ाळ, महागडे हँडबॅग, पर्स, ब्रँडेड बूट, गोल्फ किट, होम थिएटर सिस्टम, यासह अन्य काही वस्तूंवर एक टक्का टीसीएस लावला आहे. कोणत्याही सामानाची खरेदी जर दहा लाखांपेक्षा जास्त होत असेल, तर त्यावर एक टक्के टीसीएस लागेल, असे सीबीडीटीने म्हटले आहे.