एअरटेलने जिओला टाकले मागे

नवीन ग्राहक जोडण्यात एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. जानेवारीत एअरटेलने सर्वात जास्त 16.5 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत, तर जिओने 6.8 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जानेवारी 2025 चा दूरसंचार पंपन्यांच्या सब्सक्रायबरचा डेटा जारी केला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे. जिओसोबत व्होडापह्न-आयडिया (वीआय) आणि बीएसएनएलचे ग्राहकही मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहेत.