तुर्कीतील इस्तंबूलमध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; 1 तासात 3 मोठे धक्के

तुर्कीमधील इस्तंबूल येथे बुधवारी 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. याचे केंद्र इस्तंबूलजवळील मरमारा समुद्रात होते. तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने बुधवारी सांगितले की, भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. येथे एक तासात तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनेही भूकंपाची माहिती दिली आहे. तसेच हा भूकंप जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे म्हटले आहे. शहर आणि परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, भूकंपाचे केंद्र सिलिवरीजवळ होते, जो भूकंपाच्या हालचालींसाठी ओळखला जाणारा किनारी भाग आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथे भूकंपात 53 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 60 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. तर 75 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. तुर्कीमध्ये 53 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 35 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.