
परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टनचा ब्रिटीशकालीन दगडी पूल हा येत्या 25 एप्रिल, शुक्रवार रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
वरळी-शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्यामुळे हा पूल पुढील तीन वर्षांसाठी वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पूलावरून जाणाऱ्या वाहनांना दादरच्या टिळक ब्रिजवरून किंवा करिरोडच्या ब्रिजवरून जावं लागणार आहे.