
जम्मू-कश्मीरच्या पहलगामध्ये देशाला हादरवून सोडणारा दहशतवादी हल्ला मंगळवारी (22 एप्रिल 2025) झाला. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून बरेच पर्यटक कश्मीरमध्ये अजूनही अडकलेले आहेत. यामध्ये अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिथल्या परिस्थिती बद्दल माहिती दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनाच आपलं टार्गेट केल्याचं सुद्धा समोर आलं आहे. या भयंकर परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या मदतीसाठी स्थानिक मुस्लिम धाऊन आले आहेत. रुपाली ठोंबरे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर आदिलभाईंनी माणुसकीचा धर्म दाखवत मदत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्या म्हणाल्या की, आदिलभाईंनी केलेली मदत मी शब्दांत सांगू शकत नाही. आदिलभाई आमच्यासाठी रडले आहेत, त्यांचा धंदा पूर्णपणे बुडाला आहे. पहलगामध्ये हल्ला झाल्यानंतर रुपाली ठोंबरेंसह जवळपास 100 लोकांना स्थानिक रहिवासी आदिलभाईंनी आश्रय दिला. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली, अशी माहिती रुपाली ठोंबरे यांनी दिली.
Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…
इथे आता कुणीही पर्यटक येणार नाहीत, त्यांना कुठलाही रोजगार मिळणार नाही. यांनी सगळ्या गाड्या लोनवर घेतलेल्या आहेत. याठिकाणी मोठी बेरोजगारीची समस्या निर्माण होणार असल्याचे, यावेळी रुपाली ठोंबरे यांच्यासोबत असलेल्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी