दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून काढू; लष्कराने तैनात केले HAL ध्रुव हेलिकॉप्टर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर सुरू केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर लष्कर आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या हेलिकॉप्टरमधून दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती मिळवली जाईल. दहशतवाद्यांना आता पाताळातूनही शोधून काढू. कश्मीरसारख्या दुर्गम भागात या हेलिकॉप्टरची खूप मदत होणार आहे.

ध्रुव हेलिकॉप्टर दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती गोळा करेल.ध्रुव हेलिकॉप्टर प्रगत सेन्सर्स आणि नाईट व्हिजनने सुसज्ज आहे. लष्कराने त्यांच्या सर्वात शक्तिशाली ध्रुव हेलिकॉप्टरपैकी एकाला श्रीनगर आणि आसपासच्या भागात उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला आणखी गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या कारवाईत एचएएल ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

एचएएल ध्रुव हे स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर विशेषतः डोंगराळ भागांसाठी डिझाइन केले आहे. या हेलिकॉप्टरचे मुख्य काम म्हणजे टेहळणी करणे, सैन्य आणि पुरवठा वाहतूक करणे आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करणे. श्रीनगर आणि आसपासच्या भागात हे हेलिकॉप्टर तैनात केल्याने दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. हे हेलिकॉप्टर सियाचीनसारख्या दुर्गम युद्धक्षेत्रात देखील खूप प्रभावी आहे. या हेलिकॉप्टरमध्ये केवलर आणि कार्बन फायबरपासून बनवलेले क्रॅश रेझिस्टंट कॉकपिट आहे. त्यात दुहेरी इंजिन आहे. अशा परिस्थितीत, एक इंजिन बिघडल्यानंतरही ते सामान्य उड्डाण सुरू ठेवू शकते.