साताऱ्यात होणार सावित्रीबाई फुले यांचे स्मारक

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे. तिथे सावित्रीबाईंचे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नायगाव येथील या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजार रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली असून याबाबत सातारा जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.