
>>मंगेश मोरे
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूकोंडीतून सुटका झाली, प्रवास आणखी सुकर झाला. मात्र सध्या या मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन महिन्यांत कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या 8,302 वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई केली. त्यातील 1890 चालकांकडून 39 लाख 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोस्टल रोड खुला करतानाच वाहतूक विभागाने प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्टल रोडवर ताशी 80 किमी वेगमर्यादा आखून दिली आहे. मात्र अनेक चालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे ताडदेव आणि वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकांमार्फत धडक कारवाई केली जात आहे.
कोस्टल रोडवर निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणारे, रेसिंग लावणारे चालक यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करतो. जे वाहनचालक तीन महिन्यांत दंड भरत नाहीत त्यांचे प्रकरण न्यायालयाकडे पाठवले जाते. नंतर संबंधित वाहन ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले जाते.
z जाफर काझी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा आरटीओ
वडाळा आरटीओने केलेली कारवाई
(जानेवारी ते मार्च)
दोषी वाहने 4049
निकाली प्रकरणे 1400
दंड वसुली 28,00,000
ताडदेव आरटीओने केलेली कारवाई
(जानेवारी ते मार्च)
दोषी वाहने 4253
निकाली प्रकरणे 490
दंड वसुली 11,60,000