Pahalgam Terror Attack – एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली होती दहशतवाद्यांनी रेकी, ऑटोमेटिक फायर गनने केला हल्ला

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाची सहसंघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घटनास्थळाची रेकी केली होती.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी एक ते सात एप्रिलच्या दरम्यान काही पहलगाममधील काही ठिकाणांची रेकी केली होती. तसेच गेल्या चार दिवसांपासून ते हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील बोलले जात आहे. दरम्यान या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी ऑटोमॅटीक फायर गन वापरल्याचे देखील समजते.