Pahalgam Terror Attack – तुला जिवंत सोडतोय… क्रूर दहशतवाद्यांनी पर्यटक महिलेला धमकावलं

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवामोगा येथील मंजूनाथ यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी मंजूनाथ यांची पत्नी पल्लवी व मुलाच्या समोरच त्यांना गोळ्या घातल्या. त्यानंतर पल्लवी यांनी माझ्या पतीला मारलं, मला पण मारा असं दहशतवाद्यांना सांगितलं. त्यावर दहशतवाद्यांनी तुला जिवंत सोडतोय… जा जाऊन सांग मोदीला, असं तिला सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हल्ल्यानंतर पल्लवी यांनी त्यांच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. ”मी, माझा नवरा व मुलगा तीन दिवसांपूर्वी जम्मू कश्मीर फिरायला आलो होतो. आज दुपारी दीडच्या सुमारास आम्ही पहलगाममध्ये असताना दहशतवाद्यांनी माझ्या पतीला गोळी मारली. माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीचा मृत्यू झाला. मी त्यांना सांगितले मलाही मारा. पण ते म्हणाले तुला जिवंत सोडतोय पण जा मोदीला जाऊन सांग, असे पल्लवी म्हणाल्या.

मंजूनाथ आणि पल्लवीचा अखेरचा एकत्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते दोघे शिकारा बोटीतून दल लेकमध्ये फिरत आहेत. या व्हिडीओत दोघेही खूप खूष दिसत आहेत.