तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे. या मालिकेतील भूमिका केलेले अभिनेते ललित मनचंदा यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील भावाच्या निवासस्थानी गळफास घेतला.

ललित मनचंदा हे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ इंडियाज मोस्ट वॉन्टेड, क्राईम पेट्रोल, मरियम, झांसी की रानी आणि ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकांमध्ये काम केले होते. काम मिळत नसल्आने ते सध्या आर्थिक अडचणीत होते त्यातूनच त्यांना नैराश्यही आलं होतं. काही दिवसांपूर्वीच ते भावाकडे गेले होते. तेथेच त्यांनी गळफास घेतला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.