
ओट्स आपण आहारात अनेकदा वापरतो. परंतु ओट्स केवळ आहाराच्या दृष्टीने उपयोगी नाही तर, सौंदर्याच्या दृष्टीनेही ओट्स तितकेच महत्त्वाचे आहेत. ओट्सपासुन अनेक फेस पॅक आणि फेस स्क्रब आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो. ओटस् फेस स्क्रबमुळे त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले वाढून, चेहरा सुंदर दिसतो. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. ओट्स एक्सफोलिएशनसाठी वापरले जाऊ शकतात. ओट्स एक्सफोलिएशनद्वारे त्वचेचे छिद्र साफ करण्याचे काम करतात. तसेच मुरुम काढून टाकण्यास आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करते.
ओट्सचे दाहक-विरोधी गुणधर्म सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कोरड्या त्वचेचे रक्षण करतात. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जो अँटी-ऑक्सिडंट आहे. तसेच त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. ओट्सपासून आपण बर्याच प्रकारचे स्क्रब बनवू शकतो.
Facewash- घरातील या गोष्टींपासून बनवा नैसर्गिक फेसवाॅश! त्वचा मुलायम राहील आणि चमकदार होईल
ओट्स आणि गुलाबपाणी फेस स्क्रब – ओट्सचे 2 चमचे चांगली पूड बनवावी. त्यामध्ये थोडे गुलाब पाणी घाला. ओट्स फेस स्क्रब तयार करण्यासाठी गुलाबपाणी आणि पूड एकत्र मिसळा. हे सर्व चेहरा आणि मानेवर लावावे. तसेच त्यानंतर काही मिनिटांसाठी तसेच ठेवावे. किमान 10 मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे स्क्रब वापरल्याने चेहरा तजेलदार होईल.
ओट्स फेस स्क्रब – या फेस स्क्रबसाठी ओट्स पावडर तयार करावी लागेल. ओट्स पावडर बनवण्यासाठी फूड प्रोसेसर किंवा ग्राइंडरमध्ये २ चमचे ओट्स घाला. ते बाहेर काढा आणि थोडे कोमट पाण्यात मिसळा. थंड होईपर्यंत थांबावे, हे सर्व चेहरा तसेच मानेवर लावावे. बोटांचा वापर करून, काही मिनिटांसाठी गोलाकार पद्धतीने हळूवारपणे चेहरा तसेच मानेवर मालिश करा. सुमारे 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण तसेच चेहरा व मानेवर ठेवावे. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवावा. हे असे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करायला हवे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)