चौंडीतल्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी 150 कोटी रुपयांची उधळपट्टी, काँग्रेसचा महायुती सरकारवर आरोप

अहिल्यानगरमधील मंत्रिमंडळात चौंडी येथे मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. पण या बैठकीसाठी 150 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे सरकार जनतेला आर्थिक अडचणीत टाकून स्वतः पंचतारांकित सुविधा भोगत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून सपकाळ म्हणाले की, राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारने ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये दिले नाहीत. शेतकरी कर्जमाफी केली नाही. आणि चोंडी येथे होणा-या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि व्यवस्थेसाठी 150 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. एक आठवड्यापूर्वी खा. सुनिल तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेले होते त्यावेळीही हेलिपॅडसाठी दीड कोटी रुपये खर्च केले होते. जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासुर पंचतारांकित सुविधा भोगत आहेत असे सपकाळ म्हणाले.