दारुड्यांकडून बाईकर्सना मारहाण, AI टूल वापरून घेतला आरोपींचा शोध; तरी अटक नाहीच

काही दारुड्यांनी बाईकर्सच्या ग्रुपला मारहाण केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या बाईक्सचीही तोडफोड केली आहे. हे बाईकर्स जेव्हा पोलिसांकडे पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना व्यवस्थित सहाकार्यही केले नाही. या तरुणांनीच AI टूल वापरून आरोपींचा शोध घेतला. एवढं करूनही त्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही.

या बाईकर्स ग्रुपमधील हार्दिक शर्माने आपबिती सांगितली आहे. हार्दिकने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा तीन ते चार मित्रांचा ग्रुप बाईक घेऊन नाश्त्यासाठी जात होते. तेव्हा गुरुग्राममध्ये द्वारका एक्सप्रेसवजळ एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पियने त्यांचा बॅलेन्स बिघडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हार्दिक आणि त्यांच्या मित्रांनी या गाडीला पुढे जाऊ दिले. पण ही गाडी पुढे थांबली. या गाडीतून काही तरुण नशेत तर्र होते, त्यांच्या हातात दारूचे ग्लासही होते. त्यांनी काहीही न सांगता हार्दिक आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करायला सुरूवात केली. त्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही मित्र पळून गेले. पण हार्दिकचा एक मित्र मागेच राहिला. म्हणून हार्दिक त्याला वाचवायला गेला तर या गुंडांनी त्याचावर पुन्हा हल्ला केला. हार्दिकने हेल्मेट घातले होते म्हणून को बचावला. आमचा व्हिडीओ शूट केला तर गोळ्या घालू अशी धमकी देऊन हे गुंड तिथून निघून गेले.

त्यानंतर हार्दिकने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी हार्दिकला कुठलेही सहकार्य केले नाही. सकाळी आठ वाजता हार्दिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. तब्बल बारा तासांनतर पोलिसांनी हार्दिकची तक्रार नोंदवून घेतली. या आरोपींची ओळख पटवण्यासाठी हार्दिकने पेट AI टूलचा वापर केला. एवढं केल्यानंतरही अद्याप या आरोपींना अटक झालेली नाही.