
हिंगोली गेट कॉम्प्लेक्समधील पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे 6 तासांपासून आग धुमसत आहे. या आगीत कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ननागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच 12 भरलेली सिलिंडरही हटवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये अचानक भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीची घटना सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण दुकान आणि घराला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमारतीत पंपटवार कुटुंब राहते, ज्यांचेकडे सुपरमार्केट आणि किराणा दुकान आहे. आगीची माहिती मिळताच कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि 12 भरलेली सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहेत. काही वेळातच आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
अचानक या सुपरमार्केटमध्ये आग लागली आणि काही क्षणातच आगीने भयानक रूप धारण केले. भोईमुंग, सोया आणि तेलाच्या टाक्या जळून खाक झाल्या. या सुपरमार्केटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, सुकामेवा अशा सर्व प्रकारच्या किराणा मालाला आग लागल्याने सर्व सामान जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी गेल्या सहा तासांपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 18 गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. या भीषण आगीत सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.