
जम्मू-कश्मीरमध्ये होत असलेला संततधार पाऊस आणि ढगफुटीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज दुसऱ्या दिवशीही बंद राहिला. पर्यायी वाहतूक म्हणून मुघल रोड पुन्हा सुरू करण्यात आला आहे. हा रोड राजौरी आणि पूंछ या दोन सीमावर्ती जिह्यांना शोपियान जिह्यापासून जोडतो. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला.