पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमावले हा घोटाळाच – राजू शेट्टी

आपत्ती येऊनही पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी रुपये कमावले, हा घोटाळाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.

शेतीवर अनेक आपत्ती येवूनही विमा पंपन्यांनी तब्बल पन्नास हजार कोटी रुपये कमविले, यातूनच या विमा कंपन्यांची खरी परिस्थिती समोर येत आहे. मागील काळात खोटे रेकॉर्ड तयार करून पीक विमा काढण्यात आला, त्याप्रकरणी अधिकारी निलंबित करण्यात आले. मात्र, पुढील कारवाई झालीच नाही. याचाच अर्थ सरकार या कंपन्यांना पाठीशी घालत आहे. या कंपन्यांच्या कारभाराला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. वाहन अपघाताप्रमाणे शेतकऱयांना पीक विम्याची भरपाई मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

उसने पैसे सरकारने दिले तरी जिल्हा बँक जिवंत राहतील. उद्योगांना कर्ज माफ केले, पण शेतकऱयांना मदत केली नाही, असेही ते म्हणाले. सरकारने आमदारांच्या सुरक्षेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले, त्याची आकडेवारी जाहीर करावी, घोषणेप्रमाणे सातबारा उतारा कोरा करावा. नाफेड कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, नाफेडने खुल्या बाजारात खरेदी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.