
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी-3’ हा चित्रपट पुढील वर्षी 27 फेब्रुवारी 2026 ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. यश राज फिल्म्सकडून या चित्रपटाची तारीख सोमवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘मर्दानी-3’ चित्रपटाबद्दल राणी मुखर्जीच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. त्यामुळे राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मर्दानी-3’ मध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप उघड करण्यात आले नाही.