राहुल पांडे यांनी घेतली राज्य मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांनादेखील राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव ब्रिजेश सिंग उपस्थित होते.