IPL 2025 – अर्धा हंगाम संपला, ‘हे’ खेळाडू तंबूत बसून मिरवतायत कोटींचा मुकूट

आयपीएलचा 18 वा हंगाम आता भर रंगात आला आहे. तोडफोड फलंदाजीला सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC), पंजाब किंग्स (PBKS) गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघांनी आत्तापर्यंत दमदार कामगिरी करत उर्वरित संघांना जबरदस्त टक्कर दिली आहे. दुसरीकडे मुंबई आणि चेन्नई सारखे चॅम्पियन संघ एका एका विजयासाठी झुंजत आहेत. त्याचबरोबर काही नवख्या खेळाडूंनी आपला दम दाखवत आपापल्या संघांच्या विजयात खारीचा वाटा उचलला आहे. मात्र, दुसरीकडे लिलाव प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांची बोली लागलेले काही खेळाडू अजूनही बेंचवरच आहेत.

औटघटकेची ऑरेंज कॅप; पूरनने तासाभरात सुदर्शनच्या डोक्यावरून काढली ऑरेंज कॅप

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत 2 कोटींहून अधिक किंमत मोजत काही खेळाडूंना संघांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मयांक यादव. मयांकला लखनऊने 11 कोटींची बोली लावत संघात घेतले होते. परंतु दुखापतीमुळे तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही. लखनऊची आयपीएलमधील कामगिरी अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे लवकरच त्यांच संघात पुनरागमन होईल अशी संघाला अपेक्षा आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजनला दिल्लीने 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. दिल्लीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मिचेल स्टार्क, मुकेश कुमार आणि मोहित शर्मा यांनी आतापर्यंत गोलंदाजीची कमान उत्तमरित्या सांभाळली आहे. त्यामुळे टी नटराजनला मैदानात उतरण्यासाठी आणखी काही सामने वाट पहावी लागणार असल्याची शक्यता आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त RCB च्या संघात असणारा जेकब बेथेल (2.6 कोटी), गुजरात टायटन्सचा गेराल्ड कोएत्झी (2.4 कोटी) आणि कोलकातामध्ये असणारा रहमानउल्लाह गुरबाज (2 कोटी) यांनी सुद्धा यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. हे तिन्ही खेळाडूंनी आपापल्या देशाकडून खेळताना आपला विस्फोटक खेळ दाखवला आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये यांना संधी मिळते का हे पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

पाकिस्तानची सुपर लीग डबघाईला