झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षादलाला मोठे यश

झारखंडच्या बोकारे भागात सकाळी सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. तेव्हा या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले. यात एक कोटी रुपये बक्षीस असलेल्या विवेक उर्फ प्रयाग मांझी याचाही समावेश होता. आम्ही शहीद जवानांचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया सुरक्षाबलाच्या टीमने दिली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार झारखंड पोलीस आणि सीआरपीएफच्या कोबरा कमांडोंच्या संयुक्त भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने इथे ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान पहाटे साडे पाचच्या सुमारास सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांदत चकमक उडाली आणि त्यात आठ नक्षलवादी मारले गेले.