
आपल्या पायांमध्ये आपले आरोग्य दडलेले आहे असं म्हणतात. पायाच्या तळव्यांमध्ये असलेले पाॅईंटस् आपल्या शरीराच्या सर्व भागांकडे जातात. म्हणूनच पायाच्या तळव्यांचा मसाज हा खूप गरजेचा मानला जातो. पायांच्या तळव्यांना रोज किमान पाच मिनिटे मसाज केल्याने, आपल्याला खूप सारे फायदे मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी तळव्यावर तेल लावून मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. पोटऱ्या दुखण्यापासून तर आराम मिळेलच शिवाय आपली ताण आणि चिंताही दूर होईल. पायांच्या तळव्याला तेलाने मालिश केल्याने शरीराला आणि मनाला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
पायाच्या तळव्यांना मसाज करण्याचे फायदे
पायाच्या तळव्यांना मसाज केल्यामुळे, रक्ताभिसरण वाढते आणि पायांमध्ये लवचिकताही वाढते. तसेच यामुळे तळव्यांच्या संदर्भातील सर्व आजारांवर मात करता येते. यात फ्लॅट फूट सारख्या समस्यांवरही मात करता येते.
तणाव आणि चिंतेने त्रस्त असल्यास, रात्री झोपण्याआधी पायाच्या तळव्यांना मसाज करणे खूप गरजेचे आहे. यामुळे रक्तप्रवाह सुधारते तसेच एंडोर्फिन प्रवाहित होते त्यामुळेच वेदनांचाही नाश होतो.
रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना पायाचा मसाज हा खूप गरजेचा आहे. रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी, रोज रात्री किमान पाचच मिनिटे पायाला मसाज केल्यास फायदेशीर ठरते.
संधीवातामुळे अनेकांच्या पायाला सूज येते, अशावेळी पायाच्या तळव्यांना मसाज केल्यास सूज कमी होण्यास मदत होते. कधीकधी पायाच्या तळव्यांच्या नसांमध्ये जास्त द्रव जमा होतो; अशावेळी पायाला मसाज करणे खूप फायदेशीर ठरते.
पायाच्या तळव्यांना मालिश केल्याने पीएमएस किंवा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, अशावेळी पायांचा मसाज हा खूप उपयुक्त ठरतो.
काश्याची वाटी आहे लहान, पण याचे फायदे आहेत आरोग्यासाठी महान…
वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असलेल्यांसाठी, तळव्यांना मालिश करणं हा रामबाण उपाय आहे. तळव्यांना मालिश केल्यामुळे झोपही उत्तम लागते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत होते.
उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप ही आवश्यक मानली जाते. रात्री झोपायला त्रास होत असेल तर, पायांना मालिश केल्यामुळे चांगली झोप मिळते. पायांची मालिश आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.